उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रामध्ये कायम विनाअनुदानित म्हणून शाळेस महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्या. कायम शब्द काढण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. अखेर सन २००९ मध्ये शासनाने निर्णय घेतला आणि कायम विनाअनुदानित शाळा विनाअनुदानित झाल्या. अशा प्रत्येक शाळेत प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक आ. विक्रम वसंतराव काळे यांनी केले. ते उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या शिक्षक दरबारामध्ये बोलत होते. यावेळी जि. प. चे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती धनंजय सावंत, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी प्राथमिक व माध्यमिक वेतन पथकाचे अधिक्षक, उस्मानाबाद राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इतवारे, सचिव राजकुमार मेढेकर, विभिषण रोडगे, एकनाथ चव्हाण, लहूराज लोमटे, शशिकांत आनंदे, अभिजित जाधव, चंद्रकांत सांळके, शहाजी मस्के, सुहास वडणे, नारायण खैरे, गोपीनाथ मैदाड, संभाजी गायकवाड, राहूल पाटील, महेश देशमुख, तुळशीदास पिसे, आनंद सोनटक्के, मनिषा कदम, शिक्षकेत्तर कर्मचारी खैरोटीन सय्यद, संजय कावळे, सतिश निकम, श्रीमंत पवार हे उपस्थित होते.

आ. काळे पुढे म्हणाले की, अनुदानासाठी पात्र शाळांची यादी प्रकाशित झालेली आहे. त्यांच्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये बजेटची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. आधघोषीत शाळांनी त्रुटीची तात्काळ पूर्तता करावी. सन २०१८-२०१९ व २०१९-२०२० च्या संच मान्यता शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना वितरीत करण्यात आलेल्या आहेत. संच मान्यते मध्ये विद्यार्थी संख्या चुकीची दर्शवण्यात आल्यामुळे पदे कमी होत असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासनाने समिती गीत केलेली आहे. समितीचा अहवाल शासनास सादर केल्यानंतर निर्णय होईल त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कोरांना काळात अनेक शिक्षकांचे निधन झाले. अनेक शिक्षकांना वैद्यकीय खर्च न झेपणारा होता हो बाब राज्याचे आरोग्य मंत्री मा. ना. राजेशजी टोपे साहेब यांना भेटून कोविड आजार वैद्यकीय खर्चाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी व सर्वांना वैद्यकीय लाभ मिळविण्यासाठी शासन निर्णय करून घेतला यामुळे यांचा अनेक शिक्षकांना लाभ झाला. वरिष्ठ निवड श्रेणीसाठी नोंदणीचे काम सुरु आहे व ते प्रशिक्षण विनामूल्य दयावे अशी मागणीही आपण मा. शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शिक्षक दरचारामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यावेळी आ. विक्रम काळे साहेबांनी त्यांन शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना त्याच ठिकाणी आदेश देऊन सदरील प्रकरणे निकाली काढण्यात आली व जे प्रकरण पुणे व मुंबई स्तरावरील आहेत ते आपण सोडवू असे आश्वासीत करण्यात आले.

जिल्हयातील शिक्षक कर्मचान्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या प्रातिनिधीक स्वरूपात शहरातील जीवनराव गोरे विद्यालय व प्रामीण भागामधून किसान विद्यालय, पोहनरे या शाळेना वाटप करण्यात आल्या. जिल्हयातील उर्वरीत शाळांच्या पावत्या तात्काळ वितरीत करण्याची सूचना वेतन पथकास आमदार काळे यांनी केली.

शिक्षक दरबारामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचान्यांच्या आलेल्या निवेदनावर संबंधित अधिकान्यांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यात आले.

शासन स्तरावरील प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन आमदार काळे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे यांनी केले. सूत्रसंचलन जिल्हा सचिव राजकुमार मेडकर यांनी तर आभार राजाभाऊ शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top