तुळजापूर / प्रतिनिधी-   तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी )  येथील पाच वर्षिय बालकाचा  खुन केल्या प्रकरणी सतरा वर्षिय अल्पवयीन युवकास पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

खुनाची  खळबळ जनक घटना शुक्रवार दि.१७ रोजी  उघडकीस आली तर अल्पवयीन आरोपीस  पोलिसांनी   काही  तासात या खुनाचा गुन्हा उघडकिस आणण्यास पोलिसांना यश आले

याबाबतीत अधिक माहीती अशी की,सदरील आरोपी हा सतरा वर्षाचा असुन  आरोपी   हा वडीलांचा खात्यातुन पैसे काढुन खर्चायचा त्याचा भरणा करण्यासाठी त्याने गुरुवार बारा वाजता दुपारी रस्त्यावर कुणीही नसल्याची संधी साधुन दारासमोर जाणाऱ्या ओमला घरात ओढले व नायलाँन दोरी आवळुन खुन केला नंतर कानातील सोन्याचा बाल्या काढल्या व मृतदेह शेजारील घरातील जुन्या घरात टाकले .

सकाळी आरोपीचा  वडीलांनी चिमुकल्याचा मृतदेह पाहिला त्यांनी आपला पोलिस पाटील,असलेल्या भावास सांगितल्या नंतर पोलिस बोलवुन त्याचा पंचनामा केला नंतर तुळजापूर येथील,उपजिल्हारुग्णालयात मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले.

या घटने प्रकरणी काल  गायब झाल्याचा गुन्हा दाखल केला होता यात आता आणखी 302कलम वाढविणार असल्याची माहीती पो नि अदिनाथ काशीद यांनी दिली.

 
Top