उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राकृतीक शेती, नैसर्गिक शेती या विषयावर देशातील शेतकर्‍यांना थेट प्रेक्षेपणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. हे थेट प्रक्षेपण कार्यक्रम देशभरात सर्वत्र शासकीय व निमशासकीय ठिकाणी तसेच भाजपा कार्यालयात राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने उस्मानाबाद पंचायत समिती येथे नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, किसान मोर्चाचे रामदास कोळगे, पंचायत समिती उपसभापती प्रदिप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पवार, तालुका सरचिटणीस नामदेव नायकल, भाजप नेते महेश चांदणे, संजय लोखंडे, बालाजी गावडे, विद्या माने यांच्यासह पंचायत समिती सदस्य, शेतकरी उपस्थीत होते.

 
Top