उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन विद्यार्थी सामाजिक संघटना उस्मानाबाद यांच्या वतीने महामानवाला ज्ञानवंदना या उपक्रमातुन एक वहि एक पेन अभियान राबविले जाते.या उपक्रमात फुले शाहु आंबेडकर अनुयायी उत्साहाने सहभागी घेऊन अनेक वह्या पेन जमा करतात,या जमा झालेल्या शालेय साहित्याचे वाटप गरजवंत विद्यार्थ्यांना दिले जाते.हा उपक्रम दरवर्षी दि.१४ एप्रिल व दि.६ डिसेंबर रोजी राबविण्यात येतो.उपस्थित मान्यवर नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे,राणा बनसोडे, मृत्युंजय बनसोडे,गुणवंत सोनवणे,अंकुश उबाळे, राजेंद्र धावारे सर,संपत शिंदे,रमेश कांबळे,बापु कुचेकर,नागनाथ गोडसे,विशाल शिंगाडे, निखिल बनसोडे,राजरत्न शिंगाडे,विश्वजीत कांबळे तर बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आदित्य जानराव यांच्या कडे शालेय साहित्य जमा केले.बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे गणेश रानबा वाघमारे,विजय बनसोडे,अतुल लष्करे, सोमनाथ गायकवाड यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.आदित्य जानराव यांनी आभार मानले.

 
Top