उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 एका वृत्तपत्रात आलेल्या पिक विमा योजनेच्या “जिल्हयाला मिळणाऱ्या ३७० कोटी” या बातमीमध्ये -”प्रशासनाने कंपनी बरोबर वाद घालत बसण्यापेक्षा पहिल्यांदा कंपनीकडुन येणारी रक्कम मिळवून घेणे महत्वाचे आहे. अन्यथा वादामध्ये शेतकऱ्यांची रक्कम अडकुन पडण्याची भिती होती. केंद्राच्या नोटीफीकेशनचा आधार घेतल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फटका बसला आहे”. या दिलेल्या कृषी अधिकारी  महेश तिर्थकर यांच्या विधानामध्ये पिक विमा कंपनी शासनाच्या नोटीफीकेशनच्या सोईचा अर्थ लावून कमी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्यांना म्हणावयाचे होते परंतु वार्ताहरामार्फत विधानाचा चुकीचा अर्थ गृहीत धरुन शासनाच्या ऐवजी केंद्र असे बातमीमध्ये छापण्यात आले होते. यामध्ये त्यांनी वैयक्तीक काहीही हेतू नसून सदर त्यांच्या विधानामुळे काही गैरसमज निर्माण झाला असल्यास त्या विधाना बाबत कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

यावेळी राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष भाजयुमो यांनी आक्रमक भुमीका घेऊन ती चुक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिली. व अधिकाऱ्यांनी आपला डोकं ठिकानावर ठेऊन जनते साठी कार्यरत रहावे ही सुचना केली.  या प्रसंगी शहराध्यक्ष राहुल काकडे, मकरंद पाटील प्र.का.स., जिल्हाउपाध्यक्ष राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, जिल्हा सचिव राज निकम, गणेश एडके, हिंमत भोसले, सुरज शेरकर, स्वप्नील नाईकवाडी, प्रसाद मुंडे, पंकज जाधव, जगदीश जोशी, प्रसाद राजमाने, गणेश शिंदे व युवा मोर्चा पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

 
Top