उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संस्थेच्या प्रगतीसाठी कायम झटणारे नेतृत्व म्हणून ॲड. गुंड यांचे कार्य आदर्शवत आहे असे मत ॲड. मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले.

 रुपामाता उद्योगसमूहातर्फे २०२२ या नूतन वर्षासाठी बनवण्यात आलेले कॅलेंडर आणि डायरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते रुपामाताच्या प्रधान कार्यालयात करण्यात आले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. मिलिंद पाटील होते.

 रुपामाता समूहाचे अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाडोळीकर म्हणाले, नवीन वर्षाच्या डायरी आणि कॅलेंडरचे प्रकाशन करताना मला मनस्वी आनंद होत आहे. आपल्या समूहाने अल्पावधीत जी प्रगती केली आहे त्याचा मला अभिमान आहे, सामान्य माणूस तसेच शेतकऱ्यांचे हित आपण रुपामाता समूहाच्या माध्यमातून आपण विविध प्रकारे करत आहोत. त्यासाठी आपण सर्व एकत्रपणे प्रयत्न करत आहोत, तसेच भविष्यात देखील आपण जनसेवेच्या मार्गावर अविरतपणे जात राहू. आपल्या भाषणात अ‍ॅड.गरड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, शून्यातून विश्व निर्माण करणारे गुंड हे आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहेत, त्यांच्या आदर्श प्रमाणे आपण कार्य केले पाहिजे. तसेच रुपमाता हा ब्रँड बनला आहे, तो केवळ उस्मानाबाद जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता सर्वत्र वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मिलिंद पाटील यांनी आपल्या भाषणात,गुंड यांनी आपल्या अविरत प्रयत्नातून जनसेवेचा एक आदर्श घालून दिला आहे, आपण सर्वांनी गुंड यांच्या नेतृत्वाखाली  काम करून आपल्या संस्थेची प्रगती कशी होईल याचा विचार केला पाहिजे.

 आपण सर्व एक असू तर कोणतेही संकट आपण परतवून लावू शकतो. संस्थेचे खातेदार तसेच कर्जदार याच्याशी सौहार्दाचे संबंध ठेऊन आपण प्रगती केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र विधिज्ञ मंडळाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड  राम गरड, उस्मानाबाद जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड नितिन भोसले अ‍ॅड. पांडूरंग लोमटे महाराज, अ‍ॅड शरद गुंड, अ‍ॅड.पवन पाटील, ॲड. दलभंजन यांचेसह रुपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोधले  उपस्थित होते.  सूत्रसंचालन सत्यनारायण बोधले यांनी केले.


 
Top