उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जय लक्ष्मी शुगर कारखान्याने ७ वर्षापासून शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे देण्याबाबत साखर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. यामुळे कारखान्याची जंगम मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आठ दिवसांत निर्णय न घेतल्या संघटना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पैसे मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे जय लक्ष्मी शुगर कारखान्याने ७ वार्षापासून दिले नाही. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्याबाबत साखर आयुक्तांनीही आदेश दिले आहेत. मात्र, कारखान्यांकडून पैसे दिले जात नाही. कारखान्याची जंगम मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांना तात्काळ पैसे द्यावेत, या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश घ्यावे, आठ दिवसांत कोणताही निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पैसे मिळेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करणार आहेत, असा इशारा गुरुवारी (दि.२३) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व भागातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान काही प्रसंग ओढवल्यास त्याला शासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जोतीराम भोसले, ज्ञानेश्वर भोसले, संजय बनसोडे, मधुकर भुजबळ, संतोष भुजबळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top