उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन  नायगांव (ता.कळंब) येथे  करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात नायगांव व परिसरातील सर्व वयोगटातील ६३० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन  मल्हार राणाजगजितसिंह पाटील (युवानेते) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पंडितराव टेकाळे, पं.स.मा.सभापती दत्ता साळुंके, बाळासाहेब राऊत, सरपंच सौ.वनमाला शितोळे पाटील, उप सरपंच अशोक माळी, ग्रा.प.सदस्य गौतम ओव्हळ, अनील माळी, दत्ता चव्हाण, माजी सरपंच प्रल्हाद शितोळे, माजी उप सरपंच बाळासाहेब सरवदे, माजी संचालक भरत पाटील, अभिजित शितोळे,  व्यंकट शितोळे, बाळासाहेब राऊत, गणेश शितोळे, हणुमंत गरड, गणेश चव्हाण, किरण चव्हाण, प्रकाश रसाळ, धनंजय नरसिंगे, ग्रामस्थ व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थीत होते. प्रास्तवीक प्रा. तुळशीराम उकीरडे यांनी केले. तर उध्दव शितोळे पाटी यांनी आभार मानले. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.तनिष्क ओबेराय, डॉ. शुभम सिंधरकर, डॉ.सय्यद ओवेस, डॉ.महेश लोया, डॉ.परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी शिराढोण आरोग्य केंद्राच्या डॉ.शगुफता सय्यद, डॉ.सुप्रीया सरवदे यांच्यासह आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कार्यकर्त्या यांनी व तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना  शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले.

 
Top