उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला लिगल सेल शहर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या. दरम्यान अॅड. सोनाली घाडगे  प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य ( लि.से.) यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रथम ॲड. निलेश बारखडे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (लि. से.) यांनी स्वागत केले. त्यानंतर उस्मानाबाद शहराध्यक्षपदी ॲड. कल्पना निपाणीकर मॅडम, उस्मानाबाद शहर उपाध्यक्षपदी  ॲड. छाया मैदाड मॅडम, उस्मानाबाद शहर सचिव पदी ॲड. अरुणा गवई मॅडम यांची  आज रोजी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी निवड करून निवडीचे पत्र ॲड. सोनाली घाडगे  महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या शुभहस्ते तसेच ॲड. श्रीपाद तावरे  महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देण्यात आले.  निवड झालेल्या पदाधिकारी यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी उपस्थित ॲड विलास चौरे साहेब, ॲड. आनंद पाटील यांची उपस्थिती होती.

 
Top