उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गुरुवारी (दि.9) श्री क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान चंपाषष्टी यात्रा महोत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ नारळ व फेटा देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे कळंब तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख, कळंब ओबीसी तालुकाध्यक्ष वसंत धोंगडे, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष औदुंबर धोंगडे, माजी उपसरपंच नारायण भातलवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा पाटील, बालाजी भातलवंडे, शिवाजी मते, सुरेश मते, सुभाष ढवळे, दत्तात्रय कागदे, विकास पायाळ आदींची यावेळी उपस्थिती होती.

 
Top