उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 सन २०२१ खरीप पीक विम्यापासून उस्मानाबाद तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत. या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून न्याय मिळवून द्यावा याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली आहे.

 उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे की, २०२१ खरीप पिक विमा सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरणा केलेला आहे.त्यावेळेस सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली होती. विमा कंपनीने त्या वेळेस सर्वांचे पैसे भरून घेत असताना कागदपत्रे बरोबर व निकषावर नुसार आहेत ते पाहिले होते. त्या अनुसरून पिक विमा भरून घेतलेला आहे.

 ज्यावेळेस पिक विमा मंजूर झाला. त्यावेळी असे लक्षात आले आहे की, गावगावच्या २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांना केवळ काही जणांनी विमा कंपनीकडे नुकसानीसाठी ७२ तासात कळवू न शकल्यामुळे व काही जणांना कागदपत्राची त्रुटी दाखवून सन २०२१ च्या खरीप पीक विम्या पासुन वंचीत ठेवले आहे. आज प्रत्येक शेतकरी हा ७/१२ धारक आहे. असे नाही काही,शेतकरी देवस्थान इनामी जमीन भाडेपट्ट्याने खंडाने जमीन कसत आहेत.आणि विमा भरताना विमा कंपनीने त्यांच्या विमा फॉर्ममध्ये तशा प्रकारची रखाणे उपलब्ध केले आहेत. त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी विमा भरला व कंपनीने विमा रक्कम स्वीकारली व आज रोजी विमा देते वेळेस विमा कंपनीने वरील प्रमाणे काही त्रुटी दाखवून विमा कंपनी २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांना विमा रकमेपासून वंचित ठेवत आहे. विमा कंपनीने चालवलेला हा प्रकार शेतकऱ्यावर अन्याय कारक ठरणारा आहे.  जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीस सन २०२१ खरीप पिक विमा वाटप करण्यासाठी आदेश द्यावेत. अशी विनंती शेतकऱ्यांमार्फत करण्यात आलेली आहे.

  या निवेदनावर संजय सुर्यवंशी,भुजंग सूर्यवंशी,महादेव जाधव, शिवरत्न मुंडे,आप्पा करवर,रामकिसन कात्रे, सचिन सूर्यवंशी,रावसाहेब खडके,पांडुरंग काळे, विश्वनाथ खडके,वसुदेव सूर्यवंशी,पांडुरंग लोकरे, नानासाहेब शिंदे,शिरीष कदम,सदानंद सूर्यवंशी, हरिभाऊ इंगळे,रामचंद्र वीर,लक्ष्मीकांत वीर,किरण घोडके,श्रीकृष्ण अंकुशे यांच्यासह अन्य अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केलेले आहे.

 
Top