परंडा / प्रतिनिधी : -येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी युती सरकारने घेतलेल्या जुनी पेन्शन योजनेसंदर्भात निर्णयाच्या विरोधात काळ्या फिती लावून दि.28 डिसेंबर 2021 रोजी जाहीर निषेध केला.              

  राज्य सरकारने 2005 नंतर शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन बंद केली परंतु खऱ्या अर्थाने शासकीय निमशासकीय कर्मचारी यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करता जुनी पेन्शन अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सरकारने जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीने लोकशाही मार्गाने  पेन्शन मागण्यासाठी पेन्शन मार्च काढला त्यामुळे त्या आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन तात्काळ सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना  जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध केला आहे. तेव्हा सरकारने योग्य निर्णय घेतला  नाही तर पुन्हा सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असे मत  प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.चंदनशिवे यांनी व्यक्त केले . यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी पेन्शन मागणीसाठी निषेध दर्शविण्यासाठी उपस्थित होते.


 
Top