उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती २०२२ च्या अध्यक्ष म्हणून सर्वानुमते राम दशरथ मुंडे यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी संभाजी फरताडे, सुदर्शन कुलकर्णी व सचिवपदी शिवाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

रोमा फंक्शन हॉल येथे झालेल्या शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.यावेळी जयंतराव पाटील, प्रकाशराव जगताप, भारत कोकाटे, विश्वास शिंदे, दत्ता बंडगर, मुनीर शेख, अग्निवेश शिंदे, रोहित पडवळ, भालचंद्र कोकाटे, बलराज रणदिवे, अनंत जगताप, जयराज खोचरे, नीलेश भोसले, अमित उंबरे, दिनेश बंडगर, अभिषेक बागल, पल्लू काकडे, योगेश सोन्ने, वैभव उंबरे,अमरसिंह गोरे, सुरज शेरकर, अभिलाष लोमटे, विशाल थोरात, प्रसाद मुंडे ऋषिकेश चपने, गजानन खर्चे प्रसाद राजेनिंबाळकर, विशाल पाटील, कुलदीप पवार, योगेश खळदकर, महेश देशपांडे, निरवीरुला खान, महेश उपासे, बबलू राऊत, सतीश लोंढे, अविनाश जाधव, भुतेकर तुषार, खंडू राऊत, नारायण पाटील,अभिषेक कदम, सौरभ ढोबळे आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते. सदर बैठकीत प्रतिवर्षाप्रमाणे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याचे ठरले.

 
Top