तुळजापूर / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मंदिरात महिला भाविकांसाठी हिरकणी कक्ष उभारणीसाठी श्री शामराव भीमराव शलगुंठे, (रा. बिदर ) या भाविकांना देण्याचे मान्य केले . सदरील कामासाठी अंदाजित 85 ते 90 हजार पर्यंत लागणारा खर्च करण्यास तयार आहेत यानिमित्ताने मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे व मंदिर संस्थानचे लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांनी श्रीदेवीजींची साडी व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अभियंता राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे व पुजारी विकास खपले आदी उपस्थित होते.