परंडा / प्रतिनिधी-

 विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत येणाऱ्या विविध योजनांमध्ये सहभागी होऊन आपले जीवन उज्वल करावे असे उद्गार करिअर कट्टा चे  जिल्हा समन्वयक डॉ नितीन पडवळ यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात  करियर कट्टा या फलकाच्या उद्घाटन  प्रसंगी म्हटले आहे. 

        महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करियर कट्टा अंतर्गत आयएएस आपल्या भेटीला  ,उद्योजक आपल्या भेटीला ,भारतीय संविधानाचे पारायण, वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी , फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, सायबर्सेक्युरिटी कोर्स, तांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आणि ई-फायलिंग कोर्स वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आदि उपक्रम या करियर

कट्टा उपक्रमांमध्ये समाविष्ट केले आहेत .उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कल्पनेनुसार राज्यातील वरिष्ठ महाविद्यालय मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. 

या कार्यक्रमासाठी पोलीस ठाणे परांडा येथील पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाने ,पोलीस उपनिरीक्षक नारायण एकशिंगे ,महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ दीपा सावळे ,आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेश कुमार माने यांनी केले . अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे म्हणाल्या की करियर कट्टा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमातून अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात.तेव्हा सर्वांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतःचे महाविद्यालयाचे आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे व त्यासाठी मनपूर्वक अभ्यास करावा.पोलीस उपनिरीक्षक नारायण एकशिंगे म्हणाले की सध्या दोन वर्षानंतर शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत तेव्हा विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील तर, रँगीग चे प्रकार होत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी 112 या नंबर वरती संपर्क करावा व स्वतःची काळजी घ्यावी. 

       करियर कट्टा चे महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून प्रा डॉ शहाजी चंदनशिव यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. करियर कट्टा च्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 750 ,765, 2555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच नाव नोंदणीसाठी युट्युब वरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि नियमित उपक्रमाची माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या बारकोड वर स्कॅनिंग करून माहिती घ्यावी अशी माहिती डॉ नितीन पडवळ यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ शहाजी चंदनशिव यांनी केले.


 
Top