उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सेंट्रिंग कामगार युनियन उस्मानाबाद यांनी जुनी सदस्य  कार्यकारणी बरखास्त करून नवीन सदस्य  कार्यकारणी जाहीर केली .सेंट्रिंग कामगार  युनियन अध्यक्ष पदी राजाभाऊ साळुंके यांची कामगारानच्या  सर्वानुमते निवड झाली . 

यावेळी  उपाध्यक्ष पदी विलास डोलारे, कार्याध्यक्ष पदी पाशा शेख,. सचिव श्रीनिवास शेरकर, सहसचिव गफार शेख, कोषअध्यक्ष राहुल काशीद, सदस्य रमेश राठोड, श्रावण धावारे, नानासाहेब आंगटकर, प्रवीण जकाते, संजय राठोड यांची निवड झाली . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून राजाभाऊ साळुंके यांनी कामगार  हक्का साठी लढा उभारू  आणि  कामगारांन वर होणारे अन्याय सहन करणार नाही,असे  ठणकावून संगीतले. त्यानंतर कामगारांनी शिवाजी महाराजाना पुष्पहार घालून जल्लोष साजरा केला.

 
Top