उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी निधीचा अपहार केल्याचा आराेप करत भाजपने जिल्हाध्य नितीन काळे यांच्या नेतृत्वात नगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याची होळी केली. सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

सत्ताधाऱ्यांकडून नगरपरिषदेत कचरा डेपोच्या आडून पैशांच्या अपहाराची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. नितीन काळे म्हणाले की, कचरा डेपोवरील बायोमॅनिंगचे बोगस काम दाखवून पैशांचा अपहार करुन सत्ताधाऱ्यांनी आपली आर्थिक तुंबडी भरुन घेतली आहे. स्वच्छता व कचऱ्याच्या कामात आर्थिक गैरव्यवहार करुन समस्त उस्मानाबादमधील जनतेचे आरोग्य धोक्यात घालुन जनतेच्या पैशांचा चुराडा केला आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रसंगी भाजपचे सुनील काकडे, अभय इंगळे, राजसिंह राजेनिंबाळकर, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, प्रवीण सिरसाठे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, अभिजित काकडे, संदीप साळुंके, सुजित ओव्हाळ, इंद्रजित देवकते, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, शेषेराव उंबरे, ओम नाईकवाडी, ॲड. कुलदीपसींह भोसले, अभिराम पाटील, पृथ्वीराज दंडनाईक, प्रितम मुंडे आदी उपस्थित होते.

शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग, पाण्याचे डबके साचले. मोकाट जनावरे, श्वानांचा सुळसुळाट झाला. यामुळे रहदारीवर परिणामासह छोट्या-मोठया दुर्घटना घडत आहेत. रस्ते स्वच्छ करणे, नाली सफाई करणे, घंटागाडीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, या कामात सत्ताधाऱ्यांचे लक्ष नसल्याचा आरोप केला.

कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी निधीचा अपहार केल्याचा आराेप करुन भाजपच्या वतीने नगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याची होळी करण्यात आली.

इंगळे, राजसिंह राजेनिंबाळकर, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, प्रवीण सिरसाठे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, अभिजित काकडे, संदीप साळुंके, सुजित ओव्हाळ, इंद्रजित देवकते, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, शेषेराव उंबरे, ओम नाईकवाडी, ॲड. कुलदीपसींह भोसले, अभिराम पाटील, पृथ्वीराज दंडनाईक, प्रितम मुंडे आदी उपस्थित होते.


 
Top