उस्मानाबाद (प्रतिनिधी )

तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नामदेव खरे तर उपाध्यक्षपदी दिपक रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रशालेच्या वतीने बुधवारी (दि.२२) सत्कार करण्यात आला.

सारोळा येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आहे. नुकतीच शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी नामदेव खरे, उपाध्यक्ष दिपक रणदिवे, सचिवपदी मुख्याध्यापक तानाजी वनकळस तर सदस्य म्हणून ज्ञानेश्वर माने, प्रदीप चंदणे, नितीन कठारे, बालिका मसे, खलिदा शेख, जनाबाई शिंदे, शितल माळी, नितीन पाटील, दिपाली कठारे, सई देवगिरे, नागराज गायकवाड, सुरेखा भुतेकर यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचा शॉल, श्रीफळ व फेटा बांधून प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, खंडू शिंदे, अनिल चंदणे, शिक्षक ए. एस. पाटील, पी. एल. शेषणी, शिक्षिका एस. एस. डिसले, एस. बी. मस्के, ए. एस. कानडे, उर्मिला देवगिरे आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top