उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील श्री.क्षेत्र नागनाथ महाराज देवस्थानच्या मिळकतीबाबत येथील सहायक कार्यालय आयुक्तांकडून स्वयंखुद्द चौकशी करण्यात येणार आहे.या स्वंयखुद्द चौकशीबाबत हारकत घ्यावयाची असेल तर याबाबतची नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तीस दिवसांच्या आत या कार्यालयास मिळण्याच्या बेताने पाठवावे,असे आवाहन येथील सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयातील आधीक्षक एस.डी अग्नीहोत्री यांनी केले आहे.

निरीक्षक यांनी निरीक्षक चौकशी क्रमांक 05/2021 मध्ये चौकशी करुन चौकशी अहवाल सादर केल्यावरुन येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त या देवस्थानाची स्वयंखुद्द नोंदणी करण्यासंबंधित मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम-1950 चे कलम -19 अन्वये चौकशी करणार आहेत.या चौकशीत नमूद केले न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?जंगल मालमत्ता-मौजे दहिवडी (ता.तुळजापूर) येथील गट नंबर 139 मधील क्षेत्र 00 हेक्टर 80 आर आहे.या जागेत मंदिराचे बांधकाम अंदाजे 30x60 इतके आहे,ज्याची चतुर्सिमा पूर्वेस-याच गटातील शिल्लक राहिलेली जमीन,पश्चिमेस-संपत दगडू धेंडे यांची जमीन,दक्षिणेस-मौजे काटी ते तुळजापूर जाणारा रस्ता आणि उत्तरेस-संपत दगडू धेंडे यांची जमीन.

या  स्वयंखुद्द चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा द्यावयाचा असेल त्यांनी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाच्या पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी.त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही.तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल आणि मंदिराच्या नोंदणी बाबत योग्य ते आदेश दिले जातील,असेही या आवाहनात म्हटले आहे.

 
Top