तुळजापूर/ प्रतिनिधी-

महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुनीलराव  जवंजाळ पाटील यांच्या मार्गदर्शनखाली  रविवार  दि . १२ डिसेंबर रोजी सोलापूर येथे  किल्लेदार मंगल कार्यालयात २७ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्या आयोजित केला असुन  उस्मानाबाद जिल्हायातील वधुवर पालकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा शाखेने केले आहे.

 महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपची जिल्हास्तरीय बैठक माऊली लाँज येथे मधुमती अमृतराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधव अर्थिक अडचणीत सापडला असुन मराठा समाज बांधवांनसाठी हा वधुवरपालक   मेळावा  सोयीचा ठरणार आहे हा  मोफत   असुन मराठा समाजातील युवक - युवतींचे मोफत विवाह जुळवण्याचे  काम महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून निःशुल्क केले जाते . महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत ग्रुप कार्यरत आहे . सोशल माध्यमातून मुला - मुलींच्या बायोडाटाचे अदानप्रदान करून हजारो विवाह जुळवण्यात आले आहेत .

  या वधू - वर मेळाव्यात  उस्मानाबाद जिल्हातील वधुवर पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मधुमती अमृतराव लक्ष्मी करडे पाटील उत्तम अमृतराल प्रा विलास जगदाळे प्रा धनंजय लोंढै  मनोहार पवार जयकुमार पांढरे विलास इंगळे  किरण खपले  उमाजी गायकवाड श्रीकांत कदम या पदाधिका-यांनी केले आहे.

 
Top