वाशी / प्रतिनिधी -

 वाशी येथे दिनांक 01 डिसेंबर 2021 रोजी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प अंतर्गत ई-ग्रामस्वराज पी.एफ.एम.एस. प्रणाली वापरून १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्चा संबंधीचे प्रशिक्षण संपन्न झाले. केंद्रशासनाच्या परिपत्रकानुसार येथुन पुढे 15 व्या वित्त आयोगाचा निधी हा चेक द्वारे खर्च करता येणार नाही खर्चासाठी डिजिटल स्वाक्षरी महत्त्वाची आहे. त्यासाठी ग्रामसेवकांना मेकर व सरपंचांना चेकर असे स्वतंत्र लॉगीन उपलब्ध करून दिले आहेत. सन 20-21 चा निधी 50% बंधित व 50% अबंधित असा तर सन 21-22 चा निधी हा 60% बंधित व 40% अबंधित प्रमाणात खर्च करण्याच्या सूचना आहेत.प्रथम सर्व अॉनलाईन प्रक्रिया पूर्ण करुन एम ऍक्शन सॉफ्ट नावाच्या अँप मध्ये कामाचे फोटो काढूनच अॉनलाईन केलेल्या कामावर निधी खर्च करता येईल. सदर प्रणालीचे विभागीय प्रशिक्षक अमोल व्हनकळस यांनी प्रात्यक्षिक स्वरूपातील सविस्तर प्रशिक्षण सरपंच, ग्रामसेवक व केंद्रचालक यांना दिले. ई-ग्रामस्वराज अंतर्गत ऑनलाइन 

पद्धतीने करावयाच्या सर्व प्रक्रिया चे प्रात्यक्षिक समोर दाखवण्यात आले. यावेळी प्रशिक्षणास वाशी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री.एन.पी.राजगुरु तसेच आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक सत्यवान मेटे व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 शासनाने ई-ग्रामस्वराज प्रकल्प अंतर्गत सुरु केलेली प्रणाली पारदर्शक आहे आणि या मुळे आराखड्यात जे काम आहे त्यालाच धरुन खर्च करता येणार आहे. तसेच ग्रामसेवक व सरपंच यांनी आपले स्वतःचे लॉगीन हे स्वतः वापरून व अॉनलाईन कामकाज पुर्ण करुन निधी डिजिटल स्वाक्षरी द्वारे अॉनलाईन खर्च करण्याचे आवाहन केले आहे.

एन.पी.राजगुरू -गटविकास अधिकारी वाशी 

 
Top