उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन   काळकरंजा ता.कळंब येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात काळकरंजा व परिसरातील सर्व वयोगटातील ५१० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन  मल्हार राणाजगजितसिंह पाटील   यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य वैभव  मुंडे, पं.स.सदस्य संजय भाऊ पाटील  , सोमनाथ टिंगरे , विलास मोहिते  , शरद गालट  , नरसिंग लोमटे , धनंजय कराड ,  महादेव शिंदे, आत्माराम माने, दत्ता सरंग, भिनिनाथ मोहीते, रत्नदिप लोमटे, मुकेश जाधव, शंकर सोमवंशी, ऋषी मुंडे, अभिषेक नेटके, भास्कर सावळकर बालाजी लोमटे, आशा कार्यकर्त्या, ग्रामस्थ व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थीत होते. प्रास्तवीक श्री. तुळशीराम उकीरडे यांनी केले. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.तनिष्क ओबेराय, डॉ. शुभम सिंधरकर, डॉ.सय्यद ओवेस, डॉ.महेश लोया, डॉ.परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना  शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले.


 
Top