उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नापिकी ,हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही ,कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खाजगी सावकारासह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा व कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे झालेली कोंडी मार्च 2020 ते 2021 या दोन वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी व महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या हितासाठी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे .


 
Top