उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील प्रसिद्ध छायाचित्रकार अड. राजेंद्र धाराशिवकर  यांनी सालाबाद प्रमाणे विशिष्ट विषय घेवून कॉफी टेबल बुक प्रसिद्ध केले . त्याचे विमोचन चंद्रसेन देशमुख व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अभय शहापूरकर यांचे हस्ते करण्यात आले. 

यावेळी अड. राजेंद्र धाराशिवकर  व ऋषिकेश धराशिवकर हे उपस्थित होते. अड. धाराशिवकर हे गेल्या ७ वर्षापासून विशिष्ट विषय घेवून देशाच्या विकासाचा दर स्वतः फिरून फोटोग्राफी करतात आणि त्याच विषयाचे स्व खर्चाने कॉफी टेबल बुक बनवतात. यावर्षी त्यांनी स्वतः लक्षद्वीप या भारताच्या दक्षिण पश्चिम खोल समुद्रात असलेल्या अतिशय दुर्गम अशा  केंद्रशासित  प्रदेशात प्रवास करून तेथील सागर यात्रा आपणास घडविली आहे.


 
Top