तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील मौजे बारुळ येथे स्टॅण्डर्ड चार्टड बँक, पिरामल फौंडेशन व इनेबल हेल्थ सोसायटी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने  गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी माफ दरात भेटणाऱ्या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. 

 यावेळी सरपंच सिंधुताई सुपनार, दिपक कळमकर हेरिटेरी मॅनेजर, नितीन शिंदे, सुधाकर हिंगोले, जिग्नेश मोटावर, ग्रामविकास अधिकारी के. ए. केवलराम, बाबुराव ठोंबरे, शहाजी सुपनार, सुभाष पाटील, राजकुमार वट्ठे,संजय ठोंबरे  आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सुनील नवगिरे,शहाजी सुपनार,  अनिल यावलकर,अश्विनी वट्ठे, दीपाली यावलकर, सुमन ठोंबरे, ग्रामसेवक प्रशांत भोसले, शिवलिंग स्वामी, चंद्रकांत वट्ठे, शिवराम हॊर्टे,  आदी महिलांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सुधीर सुपनार व आभार प्रदर्शन प्रशांत भोसले यांनी मानले. 

 
Top