उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील दारफळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत कार्यालय व प्रेरणा मेडिकल फाऊंडेशन, हडपसर,पुणे च्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाचा शुभारंभ गावचे सरपंच अॅड.संजय भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. लातूर येथील सुप्रसिध्द डॉ. सय्यद मतीन यांच्या कडून सदर तपासणी करण्यात आली.या शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. यामुळे नागरिकांना गावातच मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेता आला व त्यांच्या डोळ्यांचे निदान झाले. यावेळी प्रेरणा मेडिकल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जावेद शेख, भिसे सर, मुख्याध्यापक कांबळे सर, राजाभाऊ भोरे, कमलाकर देशपांडे, उमेश इंगळे, अनिकेत भोरे, मेघराज भोरे,बालाजी इंगळे, रोजगार सेवक रोहित ओव्हाळ, ग्रामपंचायत सेवक समाधान ओव्हाळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top