तुळजापूर  / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील लोहिया नगर भागातील चिमुकल्यांनी दिवाळी सुट्टीत एकत्रित येऊन शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. मोबाईल प्रभावाचा जमान्यात चिमुकल्यांनी किल्यांची प्रतिकृती साकारल्याने मोबाईल मध्ये गुंतुन पडलेल्या चिमुकले व त्यांचा पालकासाठी दिशादर्शक मार्ग ठरला आहे.

शिवनेरी किल्याची हुबेहूब प्रतिकृती चिमुकल्यांनी आपल्या हाताने उभारली असुन ही पाहण्यासाठी गर्दी होत आहे.या शिवनेरी किल्यांची प्रतिकृती उभारल्याने गड किल्यांची माहीती विध्यार्थांना होत  आहे . महाराष्ट्राला  किल्यांचा  एक गौरवशाली इतिहास आहे. यामुळे गड,किल्ले यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पुर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान चिमुकल्यांनी अभ्यासावा या करिता निर्माण केलेली आहे.येथील सायली अतुल फंड, जानवी अतुल फंड, सुष्मिता आशिष फंड, शिवम आशिष फंड, कृष्णा आशिष फंड  या चिमुकल्यांनी एकत्र येऊन परिश्रम घेत अतिशय सुंदर शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. 

या किल्ल्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती ठेवण्यात आली असून, किल्यात  मावळे, प्राणी ,शामियाना, तटबंदी, दरवाजा, तोफगोळे,पणत्यांची आरास, बुरुजांची आकर्षक मांडणी केली आहे. या कलाकृती बद्दल बालकलाकारांचे कौतुक होत आहे.

 
Top