तुळजापूर  / प्रतिनिधी-

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी झालेले दंगली संदर्भात निषेध व्यक्त करुन रझा अकादमी संघटनेवर बंदी घालण्याची मांगणी मंगळवार दि.१६रोजी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून केली आहे.

 श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तुळजापूर विभागाच्या वतीने त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या अफवेच्या कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मध्ये विविध ठिकाणी शुक्रवारी रझा अकादमी या मुस्लिम संघटनेच्या धर्मांधांनी मोर्चे काढून दंगल घडविली.त्या घटनेचा निषेध नोंदवुन अशा हिंसकपूर्व पार्श्वभूमी असलेल्या रझा अकादमी संघटनेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी म्हणून  मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले.

यावेळी महंत मावजीनाथ महाराज,महंत ईछागिरी महाराज, महंत व्यकंटअरण्य महाराज,संजय सोनवणे, सुदर्शन वाघमारे,जिओत्तम जेवळीकर, परीक्षित साळुंके,दीपक पलंगे,सौरभ कदम,योगेश कोळी,रोहित बागल,अथर्व पाटील,दिनेश धनके आदी उपस्थित होते.

 
Top