उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

सकनेवाडी ता. उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांना  ई-पीक पाहणी ॲप विषयी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात आले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित व श्री साई जनविकास प्रतिष्ठाण संचलित कृषी महाविद्यालय, आळणी (गडपाटी) संचलित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन सकनेवाडी, ता. उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. 

     कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या प्रतिक्षा कोकाटे यांनी गावातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप विषयी कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण दिले.

महसूल विभागाच्या वतीने “माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार, माझा पिकपेरा अंतर्गत शेतकऱ्यांना स्वताःच्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद करता येणार आहे. या प्रकल्पाद्वारे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई,  पिकविमा योजना, पिककर्ज वाटप तसेच कृषी विभागाच्या ईतर योजनांसाठी याचा वापर करता येणार आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे आपल्या खरीप, रब्बी व बहुवार्षिक पिकांचा पिकपेरा स्वःताला भरता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपले गट क्रमांक किंवा खाते क्रमांक याद्वारे माहिती भरून नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर ॲपच्या माध्यमातून जीपीएस असलेला फोटो अपलोड करुन आपली पिक पहाणी पुर्ण करता येणार आहे.  यासाठी शासनाने खरीप २०२१ हंगामासाठी पिक पहाणी भरण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. एकदा पिकांची माहिती भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. शेतकऱ्यांनी ॲप मध्ये माहिती भरताना पिकांची व क्षेत्राची माहिती काळजीपूर्वक भरावी. काही अडचण येत असल्यास तलाठी,  कृषीसहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिक्षा कोकाटे यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी कार्यक्रम समन्वयक तथा विषय शिक्षक प्रा. शेटे, यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य- पाटिल. के. एच.  कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एन. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील इतर  सर्व प्राध्यापकवृंद यांच्या मार्गदर्शनाने कृषिकन्या प्रतीक्षा कोकाटे यांच्यामार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम डकवाडी येथे घेण्यात येत आहे.

 
Top