३९ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात चोरी, दरोडा घालून धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांची गुप्त माहिती मिळवून दोन अट्टल दरोडेखोरांचा तब्बल दीड किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले ३९ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, मंगळसूत्र, बाळी, मनी असे दागिने व २ मोटारसायकलसह तब्बल ५ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ही दमदार कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.२८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागात दरोडे, जबरी चोरी ,घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपींची गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी अजय श्रावण शिंदे  (वय-२१ वर्षे), सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २३ वर्ष) दोघे रा.सुभा हमु साळुंके नगर उस्मानाबाद यांचा एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून पकडून त्यांच्या तब्यातुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. यामध्ये २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन किंमत ९६ हजार रुपये तर १५ ग्रॅम  वजनाचे सोन्याचे गंठण किंमत ७४ हजार रुपये  तसेच १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळ सूत्र ४८ हजार रुपये, सोन्याचे मणी २ ग्रॅम वजनाचे १० हजार रुपये, सोन्याची २ ग्रॅम वजनाची बाळी किंमत १० हजार रुपये, विविध कंपन्यांचे १ लाख ८४ हजार रुपये किंमतीचे १६ ऍंड्रॉइड मोबाईल तर २० हजार रुपये किंमतीची एक मोटारसायकल, दरोडा व जबरी चोरी करण्यासाठी वापरलेली ३ हजार रुपये किंमतीची कटर, टॉमी व कटावणीसारखी हत्यारे, गुन्हा करण्यासाठी वापरलेली ९० हजार रुपये किंमतीची असा एकूण ५ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

 अजय श्रावण शिंदे (वय-२१ वर्षे), सुनिल ऊर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय-२१ वर्षे) या दोन्ही दरोडेखोरांना अटक केली आहे. तर किरण श्रीमंत भोसले, डुंम्या श्रीमंत भोसले, अजय किरण भोसले हे ३ दरोडेखोर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील झाडी बोरगाव 

व लाडोळा येथील हप्प्या शहाजी शिंदे हे फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलेल्या दोन्ही आरोपीकडून पोस्टे उस्मानाबाद ग्रामीण गुरनं. २६४/२०२१ कलम ३९५, ३९७  भादवि, २७०/२०२१ कलम ३७९ भादंवि, पोस्टे ढोकी  गुरनं. १९२/२०२१ कलम ३९४ भादवि, पोस्टे येरमाळा गुरनं. १४३/२०२१ कलम ३७९ भादवि, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पो.स्टे म गुरन ३८१/२०२१ कलम ३७९ भादंवि या ५ चोरीतील गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर अटक आरोपी अजय श्रावण शिंदे हा १२ गुन्ह्यामध्ये व आरोपी सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे हा ६ गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाला आहे.

ही धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली

सपोनि शैलेश पवार, पोउपनि पांडुरंग माने, पोना हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, मपोना शैला टेळे, पोका अशोक ढगारे, बबन जाधवर, अविनाश मरलापल्ले, रवींद्र आरशेवाड, साईनाथ असमोड, चापोहेकॉ मेहबूब अरब व चापोका आनंद गोरे यांनी केली.

 
Top