उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेसने जनजागरण रथ यात्रा महाराष्ट्रभर सुरू केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील करंजखेडा गावातील नागरिकांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनजागरण रथाचे स्वागत केले. गावातील प्रमुख चौकात रथासोबत आलेले तालुका अध्यक्ष लक्ष्मण सरडे, जिल्हा सरचिटणीस अमर माने, ओबीसी जिल्हा प्रभारी काकासाहेब सोनटक्के, सुभाष हिंगमीरे, बालाजी आदटरव, महादेव वाडकर यांनी रथाचे स्वागत करून उपस्थित सर्वसामान्य नागरिकांना महागाई बद्दल जनजागरण केले.

केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सतत पेट्रोल, डीझल, गॅस, जीवनावश्यक किराणा, शेती अवजारे, खत, बियाणे, आदी वस्तूचे भाव गगनाला भिडले आहे. मात्र, मोदींच्या भूल थापांना बळी पडल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, गोरगरीब जनतेचे मोठे नुकसान झाल्याची खंत उपस्थित जनतेने बोलून दाखवली. या कार्यक्रमास नागनाथ बोरगाव, रामभाऊ पवार, बिभीषण पारध, आण्णा खटके, सलमान शेख, बालाजी माने, इरफान शेख, हणमंत सरवदे, सत्यवान पडुळे, गफूर पठाण उपस्थित होते.


 
Top