परंडा / प्रतिनिधी : - 

राष्ट्रवादी चे माजी आमदार राहुल मोटे यांनी परंडा नगरपरिषद निवडणूक पूर्व आढावा बैठक येथील नगरपरिषद सभागृहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षनिरीक्षक रमेश बारस्कर यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पक्षनिरिक्षक बारस्कर यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली की 2016 प्रमाणे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून येणाऱ्या 2021 च्या निवडणुकीमध्ये 100% उमेदवार निवडून आणावेत, त्या पद्धतीने प्रभाग निहाय, वार्ड निहाय नियोजन करावे, महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त निधी प्राप्त करणारी नगरपरिषद म्हणून परांडा नगरपरिषदेचा उल्लेख होतो.असे माजी आमदार राहुल  मोटे सांगितले, तर नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विरोधी पक्षाचे खातेपण उघडू पण देणार नाही असे उपस्थितीत पक्षनिरीक्षक व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ठासून म्हटले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, ,पक्ष निरीक्षक सुरेश बिराजदार , प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, प्रतापसिंह पाटील, युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा ताई सलगर, परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर आदींनी आपले विचार व्यक्त करून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

कार्यकर्ता आढावा बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,जेष्ठ नेते जीवनराव गोरे , राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष  सक्षना सलगर , सुरेश पाटील प्रदेश सरचिटणीस, प्रतापसिह पाटील, नितीन बागल  नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,परंडा नगर परिषदेचे  राष्ट्रवादी चे गटनेते  शेरू सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष एडवोकेट संदीप खोसे पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष वाजिद दखनी , युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष जावेद मुजावर, उपनगराध्यक्ष बब्बु जिनेरी,नगरसेवक सरफराज कुरेशी, संजय घाडगे, बच्चन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील प्रभाग निहाय कार्यकर्ते शफी पठाण , नंदू शिंदे , श्रीहरी नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते गोवर्धन शिंदे , जयंत शिंदे, घनश्याम शिंदे, तनवीर मुजावर, दत्तात्रय पाटील, अतुल गोफने, दिपक भांडवलकर, डॉक्टर रवींद्र जगताप, पिंटू दैन, संतोष भुजे, अमोल पाटील, बापू मिस्कीन, अश्रू लेंगरे, किरण डाके, संतोष सातपुते, नवाबोद्दीन मुजावर,आदी उपस्थित होते, 

परांडा नगरपरिषद निवडणूक पूर्व आढावा बैठकी मध्ये अनेक परंडा शहरातील युवकांनी माजी आमदार राहुल मोटे व नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्यावर  विश्वास ठेवून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत प्रवेश केला.या बैठकीत इच्छूक उमेदवारा सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top