परंडा / प्रतिनिधी 

महाराष्ट्र एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपास वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा देण्यात आला.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय विरोधात व त्यांच्या मागण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी ने जाहीर पाठिंबा देऊन त्यांना महाराष्ट्र शासना मध्ये विलीन करण्यात यावे, त्यांना सातवा वेतन आयोग देण्यात यावा ,आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात यावे अशा विविध मागण्या सह परांडा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने ,फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला व शाखा व्यवस्थापक यांना त्याची प्रत देण्यात आली.     

 यावेळी जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे ,परंडा तालुका अध्यक्ष दिपक ओव्हाळ ,परंडा शहर अध्यक्ष किरण बनसोडे ,तालुका महासचिव दयानंद बनसोडे, युवा नेते फिरोज तांबोळी, तालुका प्रवक्ता रणधीर मिसाळ, तालुका संघटक मधुकर सुरवसे, तालुका सदस्य भाग्यवंत शिंदे ,अरुण सोनवणे ,स्वप्निल पोळ, संदीप बनसोडे, बप्पा सरवदे, शंकर लांडगे, प्रदीप परिहार ,मारुती ओहाळ ,ठवरे रामा आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .यावेळी धनंजय सोनटक्के, मोहन दादा बनसोडे, तानाजी बनसोडे, दीपक ओव्हाळ व प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी शाखा व्यवस्थापक वाघमोडे यांना पाठिंब्याची प्रत देण्यात आली.यावेळी परंडा आगारातील चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top