उस्मानाबाद  / प्रतिनिधी - 

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नूतन अध्यक्ष ललीत बहाळे पाटील, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू, मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर हे शेतकरी संवाद जिल्हा दौऱ्यावर उस्मानाबाद येथे  दि.१० व ११ नोव्हेंबर रोजी येत आहेत . 

प्रथम दौऱ्यामध्ये  शेतकरी संघटना मजबुत करण्यासाठी जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी दि.१० नोव्हेंबर रोजी   जिल्हा बैठकीत करण्यात येणार आहेत. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर उदा. अतीवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरकारकडून मिळालेली तुटपुंजी नुकसान भरपाई, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची होत असलेली दिशा भूल, महावितरण कडून होत असलेली शेतकऱ्यांची लूट, विजेची लोड शेडींग , बँका कडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. या संदर्भात संघटने मार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करुन वंचित शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज देण्यास भाग पाडणे, गतवर्षी गाळप  केलेल्या उसाची  एफआरपी.ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली नाही अशा साखर कारखान्यावर कारवाई करणे, चालू वर्षाची एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे व चालूवर्षी गाळप केलेल्या ऊस बिलातून कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली करण्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी करुन वसुली थांबविणे, केंद्र सरकाने केलेल्या ३ शेतकरी कायदे विषयावर संघटनेची भुमीका काय आहे ? चतुरंग शेतीचा विषय, लक्ष्मी मुक्ती कार्यक्रम या व इतर विषयावर संघटनेचे अध्यक्ष  थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, सांजा, वरवंटी, भंडारवाडी, भानसगाव व वडगाव (सि) तर परंडा तालुक्यातील जवळा आदी गावांना भेटी देवून अध्यक्ष थेट शेतकऱ्यांशी संवांद साधणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरऱ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नवनाथ जाधवर, शामसुंधर लावंड, सचीन देशमुख, प्रशांत सुर्यवंशी, भारत पाटील, सिध्देश्वर सुरवसे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे


 
Top