उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.११) सकाळी नऊ ते पाच या वेळेत उस्मानाबाद नगर परिषदेच्या परिसरातील नाट्यगृहाच्या प्रांगणात शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. त्याच बरोबर विविध शासकीय कार्यालयातील लघु उद्योग, रेशीम उद्योग, पशूपालन, कृषी विषयक, समाज कल्याण आदी विभागातील योजनांची माहिती व पात्र लाभार्थींना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. याच बरोबर आरोग्य तपासणी आणि कोरोनाचे लसीकरणही करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, डॉ. डी. के. पाटील आणि सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.


 
Top