उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ येथे  रुपये २०० कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण व रुपये २०० कोटींहुन अधिकच्या विकास कामांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा दि.५ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. त्यानंतर आद्यगुरु शंकराचार्य यांनी देशभरातील ज्या तिर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला, मठांची स्थापना केली. तसेच १२ ज्योर्तीलिंग अशा देशभरातील एकुण ८२ तिर्थक्षेत्री हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा झाला. या सर्वच ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील  तुळजापुर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर मोठ्या स्क्रीनवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले. यावेळी विविध मठांचे महंत शिवाचार्य, साधु संत, प्रतिष्ठित उपस्थित होते.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाच्या प्रशाद योजने अंतर्गत विकसीत करण्याचा संकल्प करण्यात आला असून हे तिर्थक्षेत्र एक वैश्वीक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणुन विकसीत करण्यात येणार आहे.  जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा यामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी तुळजापुर तिर्थक्षेत्र वैश्वीक पर्यटन क्षेत्र म्हणुन विकसीत करण्याचा मानस व्यक्त केला होता. केंद्र सरकारचे यासाठी सर्वतोपरी सहकार्य असून स्वदेश दर्शन व प्रशाद योजनेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवून या भागाचा विकास करण्याचा संकल्प आ. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी हबप प्रकाश महाराज बोधले, हबप एकनाथ महाराज लोमटे यांच्यासह अनेक मठाचे मठाधिपती साधू-संत, औसाचे आ. अभिमन्यू पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विक्रम देशमुख, राजाभाऊ पाटील, अजित पिंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, नप उपाध्यक्ष अभय इंगळे, शहराध्यक्ष राहुल काकडे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, आनंद कंदले, शिवाजी बोधले, नारायण नंनवरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


 
Top