तुळजापूर  / प्रतिनिधी-

भारतीय गोवंशाची सेवा करणे,त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे,हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून गोसेवा हे पवित्र कार्य असल्याचे मत महंत ईच्छा गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगरूळ येथे गोशाळा चालवली जाते.वसुबारस च्या निमित्ताने गोशाळेतील गोमातेची पूजा  महंतांच्या हस्ते केली.यावेळी ते बोलत होते. 

यावेळी विशेष उपस्थित असलेले सिद्ध गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज व अरण्य गोवर्धन मठाचे महंत व्यंकटअरण्य महाराज यांनी वात्सल्यच्या माध्यमातून गोवंश संवर्धनासाठी चाललेले प्रयत्न पाहून समाधान व्यक्त केले.याप्रसंगी पंचगव्य चिकीत्सा तज्ञ श्री.संजय  सोनवणे,परशुराम पेंदे,गोसेवक अरविंद बनसोडे,प्रवीण म्हमाने,योगेश कोरे,ज्योती यमगर,सुगंधा गावडे,सुंदर यमगर उपस्‍थित होते.


 
Top