तुळजापूर  / प्रतिनिधी-

 येथील शुक्रवार पेठ पाण्याची टाकी भागातील बोंबल्या चौक भागातील राजकोल्ड्रींक्स नावाचा  दुकानातील पञ्याचा शेड मध्ये सोमवार दि.१ रोजी सांयकाळी साडेपाच वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस  पथकाने अचानक छापा मारला असता येथे तिरर्ट नावाचा जुगार खेळत असताना नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन रोख  रक्कमेसह  १४६१४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बाबतीत अधिक माहीती अशी की शहरातील शुक्रवार पेठ पाणीटाकी भागातील बोंबल्या चौकातील राजकोल्ड्रींक्स नावाचा दुकानात जुगार  चालु असल्याची माहीती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथकाने अचानक छापा मारून   तिरट नावाचा जुगार खेळ खेळतांना ९ जणांना ताब्यात घेतले.  सदर इसमांना पोलीसांनी जागेवर पकडले व त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात नगदी रुपये व जुगाराचे साहीत्य मिळुन असे एकुण १४६२४० रु / - चा मुद्देमाल मिळून आलेला आहे.  त्याच्या विरुध्द कलम ४ , ५ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे कायदेशीर फिर्याद सपोनि रोडगे  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापुर यांनी देवून पोलीस ठाणे तुळजापुर येथे गुन्हा नोंद केला आहे.


 
Top