उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शेतातील ऊसाचे पाचट काढण्यावरून चौघांनी दोघांना मारहाण केली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी सांगितले की, टाकळी (ढोकी), ता. उस्मानाबाद येथील महादेव पाटील, प्रकाश पाटील, सागर पाटील, उर्मिला पाटील हे चौघे शेतातील उसाचे पाचट काढण्याच्या कारणावरुन दि. 28 नोव्हेंबर रोजी एक वा. सु. टाकळी (ढोकी) शिवारात विशाल भोसले यांना मारहान करत होते. यावेळी रामराव पांडुरंग भोसले हे पुतण्या- विशाल यांच्या बचावास गेले असता नमूद चौघांनी रामराव यांसही शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रामराव भोसले यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top