उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी एकाला मारहाण केल्याची घटना लासोना येथे घडली आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी सांगितले की, लासोना, ता. उस्मानाबाद येथील दत्तु राघु पवार यांसह त्यांचा मुलगा अमोल यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन दि. 26 नोव्हेंबर रोजी 12.30 वा. सु. भाऊ- नामदेव राघु पवार यांना त्यांच्या शेतात शिवीगाळ करुन ऊसाने, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नामदेव पवार यांनी दि. 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top