उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील एक 17 वर्षीय मुलगी दि. 27 नोव्हेंबर  रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  कामानिमीत्त घराबाहेर गली असता ती घरी लवकर न परतल्याने तीच्या कुटूंबीयांनी परिसरात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता तीच्याबद्दल काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top