पाणलोट विकास योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक तिर्थकर यांनी मौ.मोर्डा ता.तुळजापुर येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये शेतकरी मेळाव्या मध्ये बोलताना केले.
यावेळी तिर्थकर पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवाना वसुंधरा योजने अंतर्गत पाणलोट विकास योजनेच्या विविध योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.शेतकरी बांधवानी शासनाच्या कृषी खात्या अंतर्गत इतरही योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
उस्मानाबाद प्रकल्प व्यवस्थापक गायकवाड यांंनी सविस्तर विकास कामाचा अहवाल वाचुन दाखविला.तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कृषी सहाय्यक आलमले यांनी प्रास्तावीक केले.
यावेळी पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष नवनाथ जाधव,सचिव सौ.राधीका बळीराम सुरवसे ,सरपंच सौ.मोहिनी शेंडगे कृषी मित्र प्रविण सातपुते तसेच गावातील बहूसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.