तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  काल भैरव  मंदीरात कालभैरव  जयंती शनिवार दि.२७ रोजी  विविध धार्मिक विधी संपन्न करून साजरी करण्यात आली.

श्री कालभैरव जयंती निमित्ताने   कालभैरव चे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.श्री. तुळजापूर क्षेत्री ८ भैरवांचे स्थान आढळुन येतात . यातीलच प्रमुख काल भैरव असुन शनिवारी श्री काल भैरव   जयंतीनिमित्त दुपारी २ वा . कालभैरवाष्टक यज्ञ विधी संपन्न झाला  सायंकाळी   ५ वा.मंदीर परिसरात  आकर्षक  रांगोळी काढण्यात आली.त्या नंतर सामुहीक महाआरती  करण्यात आली. नंतर कलाविष्कार ग्रुपकडून भावगित भक्तगित गायन कार्यक्रम संपन्न झाला.

 जयंती उत्सव साजरा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ( सर्व केंद्र ) तुळजापूर आणि उस्मानाबाद  कलाविष्कार ग्रुप व सर्व तुळजापूवासींयांनी परिश्रम घेतले.

 

 
Top