उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अॅड. मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मकरंद चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी ३६ विद्यार्थ्यांनी तर १० पालक व नागरिकांनी लसीचा डोस घेतला.


 
Top