उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील शेतीशी संबंधीत आठ मुद्यांवर ३ नोंव्हेंबर रोजी किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगांवकर यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी मार्केट फेडरेशनचे अधिकारी  वाजपेयी, कृषी अधिकारी  तिर्थकर व निवासी जिल्हाधिकारी  स्वामी  उपस्थीतीत दिड तासांची बैठक आयोजीत करून संबंधित मुद्यांवर योग्य त्या सूचना देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. 

  किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, किसान काँग्रेस निरीक्षक विश्वजीत शिंदे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अमर माने, प्रभाकर लोंढे, मुकुंद पाटील, बालाजी हुबाले, गोविंद  हारकर, भारत काटे, अशोक शिंदे, गोपाळ खांडेकर, रोहित थिटे, डॅा. काकासाहेब सोनटक्के, शेख कलीम, बालाजी नाईकल, केशव चव्हाण उपस्थिती होती. 

 
Top