उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद पंचायत समितीच्या उपसभापती पदी भाजपाचे सरचिटणीस प्रदीप शिंदे यांची निवड झाल्याबद्दल रुपामाता उद्योगसमूहाच्या मुख्य कार्यालयात चेअरमन ॲङ.व्यंकट गुंड यांचे हस्ते शिंदे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावेळी ॲड.शरद गुंड ,रुपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले,मिलिंद खांडेकर यांचेसह कर्मचारी उपस्थित होते

   सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की ॲड.गुंड यांनी बँकेच्या माध्यमातून तळागाळातील शेतकरी,व्यवसायिक तसेच छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना पतपुरवठा करून साखर कारखाना व दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याचे काम केले असून मी सुद्धा एक सामान्य तळागळातील कार्यकर्ता असून पंचायत समितीच्या माध्यमातून लोकसेवा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले

 
Top