तुळजापूर  / प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष धनाजी आनंदे आणि सचिव किरण हंगरगेकर यांचा सत्कार समारंभ मराठवाडा सामाजिक संस्था, तुळजापूर आणि मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आला.

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धनाजी आनंदे जिल्हाध्यक्षपदी आणि किरण हंगरगेकर सचिवपदी निवडून आले. त्यांच्या या यशाबद्दल मराठवाडा सामाजिक संस्था आणि मित्र परिवाराच्या वतीने गुरुवार दि.११ रोजी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.भक्तवत्सल लॉज प्रांगणात संपन्न झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष धनाजी आनंदे, सचिव किरण हंगरगेकर, पॅनल प्रमुख दिनेश वाबळे यांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव देवेंद्र पवार, कार्याध्यक्ष संदीप गंगणे उपाध्यक्ष जीवनराजे इंगळे, दास पाटील, आण्णासाहेब क्षीरसागर, अमर वाघमारे, मिलिंद रोकडे, विशाल कोंडो, आरिफ बागवान, राजू धरणे, अविनाश सराटे, प्रशांत गुरव, प्रा. प्रदीप हंगरगेकर, बाबासाहेब कदम, लक्ष्मण निकम, संतोष लोखंडे, प्रमोद शेटे, प्रा. प्रशांत भागवत दीपक पवेकर यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र पवार यांनी केले. संदीप गंगणे, मिलींद रोकडे, जीवनराजे इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. ओंकार मस्के यांनी केले.


 
Top