उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांनानिवेदन देण्यात आले.

आमदार सुजितसिंह ठाकूर आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारविरोधात निदर्शने करत घोषणा देण्यात आल्या. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने इंधनावरील करात जशी कपात केली तशीच राज्य सरकारनेही करुन नागरिकांना दिलासा द्यावा.

यावेळी नेताजी पाटील, ॲड. खंडेराव चौरे, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, इंद्रजीत देवकते, राजसिंह राजेनिंबाळकर, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, संदीप कोकाटे, विजय दंडनाईक, समाधान मते, प्रवीण शिरसाठे, रामदास कोळगे, संजय लोखंडे, मनोज रणखांब, नामदेव नायकल, अभय इंगळे, प्रवीण पाठक, दाजी पवार, पांडुरंग लाटे, ओम नाईकवाडी, विद्या माने, बाळासाहेब खांडेकर, युवराज ढोबळे, पांडुरंग पवार, मारुती मुंडे आदींची उपस्थिती होती.

 
Top