परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यातील अनाळा ग्रा.प.च्या वतीने कोरोणा काळात जिवाची बाजी लावून काम करणारे योद्धे व विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणारे यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि.९ रोजी येथील जुनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरिल मैदानात संपन्न झाला.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी सभापती तथा जि.प. सदस्य नवनाथ जगताप , भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे, ग्लोबल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कोरणा काळात आरोग्य विभाग , शिक्षण विभाग , पोलीस प्रशासन , विद्युत विभाग, अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस , आशा कार्यकर्ती, बचत गट प्रतिनिधी यांनी मोलाचे योगदान दिल्याने त्यांचा सन्मान मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र ,ट्रॉफी , शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कोव्हिड योद्धा पुरस्कार डॉ.अमृता भांडवलकर ,डॉ.हांगे ,डॉ.सतिश पाकणीकर , आरोग्य सेविका सुनिता मिटकर , श्रीमती शिंगटे ,परिचर ओव्हाळ ,जि.प.शाळा मुख्याध्यापक साळूंके , पोलीस हेड कॉन्सटबल गजानन मुळे , विजतंत्री अमोल जाधव ,राज्य राखीव पोलिस दलाचे लक्ष्मण क्षिरसागर , महाराष्ट्र पोलीस रमेश क्षिरसागर , समाजसेवक साजिद शेख , शिक्षक रेवननाथ कदम,आशा कार्यकर्ती अनिता क्षिरसागर , जयश्री हिवरे , अंगणवाडी सेविका जाधव एस. एस.,शेख एच. एस .मोरे वंदना , बचत गट प्रेरिका नौशाद शेख यांना देण्यात आला.नीट परिक्षेत ७२० पैकी६१६ गुण प्राप्त करणारा विद्यार्थी अय्याज मुर्तुझा कबीर , कृषी पदवी प्राप्त आनंद हिवरे यांचा विशेष सत्कार जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत , जि.प . सदस्य नवनाथ जगताप , भाजपाचे तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, सरपंच अंबिका क्षिरसागर यांच्या वतीने करण्यात आला.

   यावेळी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनाळा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना दिली . जि.प. सदस्य नवनाथ जगताप यांनी अनाळा ग्रामपचायत ने आयोजित केलेल्या सन्मान सोहळया चे तोंड भरून कौतुक केले.असा आदर्श तालुक्यातील ग्रामपंचायत ने घ्यावा असे आवाहन केले.भाजपा नेते तथा सरपंच पती जोतीराम क्षिरसागर यांनी ग्रा.प.च्या विविध कामाचा लेखा जोगा आपल्या भाषणातून ग्रामस्थां समोर मांडला . तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे यांनी ही आपल्या भाषणातून या सन्मान सोहळ्याचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक पठाण , न्यु हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक वसंत हिवरे,डॉ. प्रकाश सरवदे , प्रगतशील शेतकरी तथा उदयोजक बिबिशन शिंदे , उपसरपच दादासाहेब फराटे,ग्रा.प. सदस्य कल्याण शिंदे ,अजित शिंदे , अशोक शिंदे, स्वाती चव्हाण , अर्चना कदम , उदयोजक भारत जाधव , युवा नेते भाऊसाहेब पाटील , समाज सेवक हारी शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रा.प. सरपंच - उप सरपंच , सदस्य , ग्रामसेवक ओमप्रकाश बिराजदार, लिपिक भिवा चव्हाण , पाणी पुरवठा चे समाधान गोडसे व तरुण वर्गानी मोठे परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सुत्रसंचालन सोमनाथ कदम यांनी केले तर आभार पत्रकार निशिकांत क्षिरसागर यांनी मानले.

 
Top