उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जनता सहकारी बहुराज्यीय बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षीक निवडणुकीनंतर डीडीआर सुनील शिरापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सिध्दाई मंगल कार्यालयात बैठक झाली. 


या बैठकीत डीडीआर शिरापुरकर यांनी जनता बँकेचे निवडून आलेले संचालक मंडळ जाहीर केले. याच बैठकीत बँकेच्या चेअरमन पदाची निवड २ डिसेंबरला सकाळी ११ वाजता बँकेच्या सभागृहात घेण्याची नोटीस बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शोभा वारद यांनी संचालकांना दिली. या बैठकीस माजी चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, नुतन संचालक वसंतराव नागदे, विश्वास शिंदे, वैजीनाथ शिंदे, आशिष मोदाणी, तानाजी चव्हाण, सुभाष गोविंदपुरकर, प्रदिप पाटील, निवृत्ती भोसले, सुभाष धनुरे, नंदकुमार नागदे, पंकजा पाटील, राजु पाटील, हरी सूर्यवंशी, करूणा पाटील आदी संचालक उपस्थित होते. बँकेचे सरव्यवस्थापक महादेव गायकवाड, डीडीआर ऑफिसचे शाहापूरकर पुर्व संचालक  उपस्थित होते. 


 
Top